महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ranjit Singh Disley : डिसले गुरुजींना 'डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार जाहीर - एपीजे अब्दुल कलाम

रणजितसिंह डिसले ( Ranjit Singh Disley ) यांना डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन ( Dr. APG Abdul Kalam Pride of India Award announced ) गौरविण्यात येणार आहे. याबाबत डिसले गुरूजींनी ट्विटरवरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

Ranjit Singh Disley
रणजितसिंह डिसले

By

Published : Jul 25, 2022, 9:10 PM IST

सोलापूर-आंतरराष्ट्रीय 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळवणारे भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले ( Ranjit Singh Disley ) गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. डिसले गुरुजींना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम ( APG Abdul Kalam ) यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन ( Dr. APG Abdul Kalam Pride of India Award announced ) गौरविण्यात येणार आहे. तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे डिसले गुरूजींना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. डिसले गुरुजी माढा तालुक्यातील परितेवाडी येथील शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

ट्विटरवरून माहिती -रणजितसिंह डिसले गुरूजींनी याबाबत ट्विटरवरून ही माहिती प्रसिद्ध केली आहे. पुरस्काबाबत डिसले यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवले अशा आदरणीय डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली आहे. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दरवर्षी डॉ. ए. पी. जी.अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, महिला सबलीकरण, संगीत क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येतो.

रणजितसिंह डिसले यांना डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार

हेही वाचा -Rakshabandhan: ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती

डीसले गुरुजी 8 ऑगस्टला अमेरिकेला जाणार- ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली आहे. 8 ऑगस्टला डिसले गुरूजी अमेरिकेला जाणार आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत डिसले गुरुजींना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सहा महिने रजा मागितली होती. शिक्षण विभागाने त्यांची रजा नामंजूर केली होती. यानंतर राज्यभरात डीसले गुरुजी चर्चेत आले होते. अखेर माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्यस्थी करून त्यांची रजा मंजूर केली होती.

चौकशी अहवालात डीसले गुरुजीवर ठपका-जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार डीसले गुरुजींची पाच सदस्यीय टीमने चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालानुसार रणजितसिंह डीसले 34 महिने शाळेत हजरच नव्हते. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार होती. मात्र, 7 जुलै रोजी डीसले गुरुजींनी राजीनामा पूर्व नोटीस दिली आहे. एक महिन्यांनंतर डीसले गुरुजींचा राजीनामा मंजूर होण्याची शक्याता आहे. राजीनामा मंजूर होण्याअगोदर डीसले गुरुजी शिक्षण आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपली कैफियत मांडणार आहे. त्यांचा राजीनामा मंजूर होणार का नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा -Voter Card Aadhar Link : मतदार कार्ड आधारशी लिंक होणार; 1 ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

ABOUT THE AUTHOR

...view details