महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवेढा येथे घरकुल लाभार्थ्यांकडून गाढव मोर्चा - Mangalvedha Donkey Morcha news

मंगळवेढा येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेतील पैसे जमा न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी खात्यावर पैसे जमा करावेत या मागणीसाठी मंगळवेढा नगर परिषदेवर गाढव मोर्चा काढला.

Donkey Morcha in Mangalvedha By Gharkul beneficiaries
मंगळवेढा येथे घरकुल लाभार्थ्यांकडून गाढव मोर्चा

By

Published : Jan 24, 2021, 7:23 AM IST

पंढरपूर -मंगळवेढा येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, घरकुल योजनेतील पैसे जमा न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांनी खात्यावर पैसे जमा करावेत, या मागणीसाठी मंगळवेढा नगर परिषदेवर गाढव मोर्चा काढला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून गाढव मोर्चा काढून मंगळवेढा नगर परिषद समोर आंदोलन करण्यात आले.

आदित्य हिंदुस्तानी बोलताना...


साडेतीनशे घरकुल योजनेचा प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पांमधील पंतप्रधान आवास योजना प्रकल्प आहे. मंगळवेढा नगर परिषदेकडून 2019 ते 2020 या काळात मंगळवेढा शहरातील गोरगरिबांसाठी साडेतीनशे घरकुल योजनेचा प्रकल्प मंजूर करण्यात आला. लाभार्थ्यांनी योजनेमध्ये पैसे भरून योजनेचा लाभ घेतला. मात्र दीड वर्ष उलटली तरीही योजनेतील एक रुपयाही लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. नगरपरिषदेने लवकरात लवकर निधी जमा करावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

उग्र आंदोलनाचा इशारा
साडेतीनशे घरकुल लाभार्थ्यांकडून गाढव मोर्चा काढताना मंगळवेढा नगरपरिषदेच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. जर नगर परिषदेकडून घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही. तर उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

हेही वाचा -सोलापूरमध्ये काँग्रेसचा अर्णव गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून आक्रोश

हेही वाचा -इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे 'भैन्स के आगे बिन बाजाओ' आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details