सोलापुरात कुत्र्यांचे फॅशन शो सोलापूर: सोलापुरातील होम मैदान येथील कृषी प्रदर्शनात डॉग शो आयोजित करण्यात आले होते.(Dog fashion show in Solapur) या प्रदर्शनात श्वान फॅशन शो आयोजित करण्यात आले होते. वेगवेगळ्या देशी व विदेशी श्वानांनी यामध्ये सहभाग घेतला होता. (Solapur show ) स्पेन देशातून आयात केलेला बिशॉन फ्रीजे हा स्पेन देशातील विदेशी जातीचा श्वान कौतुकाचा विषय झाला होता. (Solapur fashion show) साडेपाच लाख रुपये याची किंमत आहे, (Bichon Frize dog) सोलापुरातील फॅशन शो साठी शहरात आणला असल्याची माहिती कोल्हापूर जिल्ह्यातील श्वानाचे मालक व उद्योजक सिद्धार्थ काशीद यांनी दिली.
डॉग शो मध्ये देशी विदेशी जातीचे श्वान:कृषी प्रदर्शनात आयोजित केलेल्या डॉग शोमध्ये देशी विदेशी श्वानाचा मोठा सहभाग होता. यामध्ये जर्मन शेफर्ड, पामोलियन, डाबरमॅन, शिजो, रॉट व्हीलर, पिटबुल,मिनी पम, पग अशा विविध प्रकारच्या 72 श्वानानी सहभाग घेतला होता. डॉग शो आयोजकांनी ता कार्यक्रमात जनजागृती केली आहे. कुत्रा ही जात अतिशय प्रामाणिक जात आहे. त्याला ज्याप्रमाणे शिकवले जाईल, त्याप्रमाणे शिकते अशी माहिती यावेळी आयोजक डॉ सत्यजित पाटील, महेश दळवी, ऍड स्वप्नाली चालुक्य, विनोद तुमा यांनी दिली आहे.
बिशॉन फ्रीजे स्पेन मधील श्वान आकर्षणाचे केंद्र:कोल्हापूर जिल्ह्यातील युवा उद्योजक सिद्धार्थ काशीद यांनी आणलेल्या कुत्र्यांने फॅशन शो मध्ये सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. स्पेन देशातुन बिशॉन फ्रीजे हा विशिष्ट जातीचा श्वान आणला आहे, याची किंमत साडेचार लाख रुपये असून त्याला भारतात आणण्यासाठी 1 लाख रुपये खर्च असे एकूण साडेपाच लाख रुपये किंमतीत आणले असल्याची माहिती दिली. बाहुल्या सारख (टेडीबेअर) प्रमाणे त्याचे केस असून अतिशय हुशार जात असल्याची माहिती यावेळी दिली.
या अगोदर पुण्यात झाले कार्यक्रम:पुणे तिथे काय उणे असं कायम म्हटलं जातं. त्याच पुण्यात प्राणीप्रेमींची संख्या देखील भरपूर प्रमाणात आहे. पुणेकर कुत्र्यांचा आणि मांजरींचा वाढदिवस देखील जल्लोषात साजरा करतात. मात्र आता पुण्यात कुत्र्यांचा आणि मांजरीचा फॅशन शो आणि कॅट वॉक होणार आहे. त्यामुळे पुण्यात आता कुत्रे आणि मांजरी नटलेल्या आणि रॅम्पवर अवतरलेल्या दिसणार आहेत. यासाठी अनेक प्राणीप्रेमी पुणेकरांनी आपल्या प्राण्याच्या ग्रुमिंगला सुरुवात केली आहे. पेटगाला या शोमध्ये पाळीव प्राण्यांच्या करामती बघायला मिळणार आहे.
सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. तर याच क्रूरतेला आळा घालण्यासाठी प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत करण्यासाठी पेटगाला या पेट शोचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे.