माढा (सोलापूर) -सध्याच्या कलियुगात जन्मदात्या आई, वडिलांचा सांभाळ करण्यास नकार देणारी मुले समाजात आढळतात. मात्र, मुक्या प्राण्यांनाही मायेचे महत्व कळते याचे उदाहरण माढा शहरात समोर आले आहे.
श्वान घेत आहे मांजराच्या पिलाची काळजी माढा शहरात चक्क श्वान माजराच्या पिलाची आई झाली असून ती पिलाचा सांभाळ करण्या बरोबरच नित्यनियमाने त्याला दूध पाजुन आईची माया देत आहे. माणसाला ही माणुसकी शिकवणारी ही आगळी वेगळी घटना अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी तर आहे. शिवाय मातृत्वाचं नात आधोरेखीत करणारी अशीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील रहिवासी असलेल्या आरे कुटुंबियांच्या घरी ही श्वाना तिची चार पिल्ले व एक मांजराचा पिलाचा सांभाळ करीत वास्तव्यास आहे. आरे कुटुंबातील हर्षवर्धन संतोष आरे हा शालेय विद्यार्थी व्यायामाला जात असताना त्यांच्या मागे हे मांजराचे पिल्लु येत होते.
घरी असलेले श्वान मांजरीच्या पिलाला इजा करेल या भीतीने हर्षवर्धन मांजराच्या पिलाला हकलून लावत होता. मात्र, त्या पिलाने त्याचा मागे लागत आरे यांचे घर गाठले. मांजराच्या पिलाला पाहताच श्वानाने पिलाकडे धाव घेतली व दाता धरले. मात्र, कोणतीही इजा न करता त्या श्वानाने स्वतःच्या पिलाजवळ मांजराच्या पिलाला नेत दूध पाजले. हे चित्र पाहून मात्र आरे कुटुंबिय मात्र सुखावले. गेल्या आठवड्याभरापासून ही श्वान रोज नित्यनियमाने निष्पाप जिवाची भुक भागवू लागली आहे. ही घटना परिसरात कुतूहलाचा विषय बनली आहे.
इकडे तिकडे गेली की आणते शोधून
हे मांजराचे पिल्लू निवाऱ्याबाहेर कुठे इकडे तिकडे गेले तर श्वान पिल्लाचा शोध घेऊन त्या पिलाला शोधून निवाऱ्याच्या ठिकाणी आणते. तिचा लळा तर लागलाच पण श्वानाला तिच्या पिल्लापेक्षा मांजरीच्या पिल्लावर जीव अधिक लागल्याचे दिसते.
हेही वाचा -कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत वा.ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन