महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकारी कार्यालयातच पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांना चावा

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. दिवसभर शासकीय कामानिमित्त अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक हे कार्यालयात येतात. परंतु, या मोकाट कुत्र्यांकडे महापालिका प्रशासनाने पार दुर्लक्ष केले आहे, असा आरोप धनाप्पा हिरेमठ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातच पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांना चावा

By

Published : May 3, 2019, 11:37 PM IST

सोलापूर - जिल्हाधिकारी कार्यालयातच पिसाळलेल्या कुत्र्याने चक्क तिघांना चावा घेतला आहे. येथील तहसील कार्यालयमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या दोघा नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतला. यानंतर अर्ध्या तासातच त्या कुत्र्याचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयातच पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांना चावा

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कार्यालयाच्या परिसरात ३० ते ४० पेक्षा अधिक कुत्रे फिरत असतात. कार्यालयामध्ये फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांपैकी एक कुत्रा पिसाळला होता आणि त्या कुत्र्याने तीन जणांना चावा घेतला. यामध्ये दक्षिण तहसीलमध्ये काम करणारे हिरेमठ हे कार्यालयातून टपाल घेऊन बाहेर पडले असता त्यांच्या हाताला कुत्र्याने चावा घेतला. यावेळी कुत्रा हिरेमठ यांचा हात सोडत नव्हता. तेव्हा आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी कुत्र्याला हाकलून दिले.

त्यानंतर याच पिसाळलेल्या कुत्र्याने जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या दिंडोरी येथील शंकर धुळे यांच्या हाताला आणि पाठीला चावा घेतला. तसेच सोलापूर शहरातील संतोष पवार या तरुणालादेखील या कुत्र्याने पोटाला चावा घेतला आहे. पिसाळलेला कुत्रा हा इतका आक्रमक झाला होता की संतोष पवार याचे कपडेदेखील या कुत्र्याने फाडले.

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली असतानादेखील या कुत्र्यांकडे लक्ष दिले जात नाही. दिवसभर शासकीय कामानिमित्त अधिकारी तसेच सर्वसामान्य नागरिक हे कार्यालयात येतात. कार्यालय परिसरामध्ये ११ ते ६ एवढाच वर्दळीचा वेळ असतो. तर उर्वरित वेळी या परिसरात कोणीही फिरकत नाही. त्यामुळे कुत्र्यांनी या परिसरावर ताबा मिळवला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयसोबतच जिल्हा परिषद तसेच प्रशासकीय इमारतींच्या आवारामध्येही मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या मोकाट कुत्र्यांकडे महापालिका प्रशासनाने पार दुर्लक्ष केले आहे, असा आरोप धनाप्पा हिरेमठ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details