पंढरपूर-गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे तसेच पडझड झालेल्या घरांचे सूक्ष्म पंचनामे करावेत. कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी व बाधित कुटुंब वंचित राहणार नाही, याची दक्षता संबधितांनी घ्यावी अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. तसेच चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षण भिंत कोसळल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुंटुबियांची भरणे यांनी भेट घेतली. शासनाच्या वतीने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते.
पिकांचे, घरांचे तातडीने पंचनामे करा! पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या सूचना - पालकमंत्री दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे यांनी आज पंढरपूर येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. तसेच चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षण भिंत कोसळल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुंटुबियांची भरणे यांनी भेट घेतली.
भरणे म्हणाले, पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटावरील संरक्षण भिंत कोसळल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुबियांना शासनामार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल. निकृष्ट दर्जाचे घाट बांधणी करण्याऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यांमध्ये कोणीही दोषी आढल्यास संबधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. बंधाऱ्यांचे व पाझर तलावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करण्यासाठी सांगितले आहे. शासन शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शासनस्तरावरुन नियमानुसार आवश्यक मदत करण्यात येणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या विविध भागांची माहिती दिली तसेच प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.