सोलपूर- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या कालावधीत गरीब आणि गरजू लोकांना भोजन उपलब्ध व्हावे. यासाठी शिवभोजनालये केंद्र उद्यापासून (दि. 29 मार्च) सुरू करण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शहरातील शिवभोजन केंद्र चालकांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील उपस्थित होते. याबाबत राज्य शासनाने काल सूचना दिल्या होत्या. सोलापूर शहरात 5 ठिकाणी शिवभोजनालय केंद्रे आहेत.