सोलापूर - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर यांचे व्यवसाय चालू करण्यास मंजुरी दिली आहे. हा आदेश फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित असून महापालिका क्षेत्रासाठी मनपा आयुक्त स्वतंत्र आदेश काढतील, असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. हे आदेश शनिवारपासून लागू असतील अशी माहिती देण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील कटिंग दुकानांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी - कटिंग दुकानांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी
ग्रामीण भागातील केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर यांचे व्यवसाय चालू करण्यास मंजुरी दिली आहे. हा आदेश फक्त ग्रामीण भागासाठी मर्यादित असून महापालिका क्षेत्रासाठी मनपा आयुक्त स्वतंत्र आदेश काढतील, असे सोलापूर जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.
![ग्रामीण भागातील कटिंग दुकानांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी District Collector's approval for cutting shops in rural areas](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7785426-205-7785426-1593186263157.jpg)
ही परवानगी देत असताना हेअर कट, हेअर डाय, वॅक्सिंग या कामांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्वचेची संबंधित असणाऱ्या दाढी, मसाजच्या सेवांना परवानगी नाकारण्यात आली आहे. यापूर्वी 31 मे रोजी ज्या ब्युटीपार्लर, केश कर्तनालय, स्पा सेंटरला मंजुरी देण्यात आली होती, अशा दुकानांना शनिवार पासून परवानगी असेल. ज्या सेवांना मंजुरी देण्यात आली नाही याबद्दल दुकानांमध्ये स्पष्टपणे ठळक अक्षरात दाढी, फेस मसाज केले जाणार नसल्याचे फलक दुकानांमध्ये लावण्यात यावे. असे आदेशात उल्लेख करण्यात आले आहे.
दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हँड ग्लोवज, मास्क, अॅपरनचा वापर करावा व तसेच सेवा दिल्यानंतर खुर्च्या टॉवेल, नॅपकिन यांचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. ग्राहकांसाठी डीसपोजेबल टॉवेल वापरण्यात यावे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या आदेशान्वये ग्रामीण भागातील केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, स्पा सेंटर यांना दिलासा मिळाला आहे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्रातील दुकानांना परवानगी नाकारण्यात आली आहे.