माढा -सोलापूर जिल्ह्यातील माढा नगरपंचायतीच्या प्रशासक म्हणून माढ्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. तसा आदेश देखील नगरपंचायतीला प्राप्त झाला आहे.
माढा नगरपंचायतीची ८ मे रोजी मुदत संपली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या नगरपंचायती आणि नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्तीचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश काढले आहेत. माढा ग्रामपंचायतीचे ११ सप्टेंबर २०१५ रोजी नगरपंचायतमध्ये रुंपातर झाले. पहील्या निवडणुकीत साठे गटाने नगरपंचायतीवर बहुमताचा झेंडा फडकावला होता. माढ्यात दादासाहेब साठे, झुंजार भांगे, राजेंद्र चवरे, आनंद कानडे या 4 राजकीय गटात शहराची निवडणूक पार पडली.