पंढरपूर (सोलापूर) - यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1601 कोटी रुपयांचे खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यावर्षी कोरोना तसेच नैसर्गिक आपत्ती असतानाही शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खरीप हंगामामध्ये 111 टक्के कर्ज वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे.
लक्ष्यांकाच्या 111 टक्के पिककर्ज वाटप -
कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यानंतर आलेल्या मौसमी संकटातूनही उभारी घेत जिल्हा प्रशासनाकडून खरीप पीक योजनेत शेतकऱ्यांना 1600 कोटींचे वाटप झाले आहे. यंदाच्या खरिपात पिककर्ज वाटपासाठी एक हजार 438 कोटी रुपयांचा लक्ष्यांक देण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र 1 हजार 601 कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. लक्ष्यांकाच्या 111 टक्के पीक कर्ज वाटप यंदा जिल्ह्यात झाले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पीक कर्जाचे वाटप -
लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळेनासा झाला होता. त्यात पेरणीसाठी पैसे नव्हते. खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना बँकेतही जाता येत नव्हते. बँकेत गर्दी झाल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका होता. मात्र, अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना राबविण्यात आल्या. त्यातली खरीप पीक कर्ज वाटपासाठी ऑनलाइन प्रणाली व इतर उपाय योजना प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घरबसल्या पिककर्जाची मागणी करता येऊ लागली. त्यातूनच संबंधित बँकेने शेतकऱ्यांची पीककर्जा संदर्भात संपर्क साधून त्यांच्या अडचणी दूर केल्या. यातूनच सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकाकर्जा संदर्भात एक सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
हेही वाचा - जैश-उल-हिंद संघटनेने स्वीकारली इस्राईल दूतावासाबाहेरील स्फोटाची जबाबदारी