सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 'अर्सेनिक अल्बम 30' रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याच्या गोळ्या ‘रहेनुमा’ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने करमाळा शहरात मोफत वाटण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष कलीम काझी यांच्या मार्गदर्शनाखाली गोळ्यांचे वाटप करण्यात आले. शहरातील पाचशे कुटुंबीयांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
करमाळ्यात 'रहेनुमा'तर्फे 'अर्सेनिक अल्बम 30' गोळ्यांचे मोफत वाटप - करमाळ्यात अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप
करमाळा शहरात मौलाली माळ, मोहल्ला गल्ली, संभाजीनगर, तालीम गल्ली याठिकाणी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या वाटप
मौलाली माळ, मोहल्ला गल्ली, संभाजीनगर, तालीम गल्ली याठिकाणी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डोस कश्या पद्धतीने द्यावयाचा हे प्रत्येकाला सांगण्यात आले.
रहेनुमाचे सचिव तसेच मुस्लिम समाजाचे नेते सुरज शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आझाद शेख यांच्या हस्ते गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी रहेनुमाचे उपाध्यक्ष इम्तियाज पठाण, मुस्लीम विकास परिषदेचे अध्यक्ष फारुख बेग, सदस्य राजू सय्यद, अमीन बेग यांनी परिश्रम घेतले.