महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरातील 40 क‌ॅम्पमध्ये 3,100 व्यक्तींच्या निवाऱ्याची सोय; 6 हजार गरजूंना अन्नधान्य वाटप - food to needy in Solapur

परराज्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील अनेक व्यक्ती सोलापूर जिल्ह्यात अडकून पडलेले आहेत. या व्यक्तींची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील गरजू 6 हजार व्यक्तींना अन्न धान्याच्या किटचे वाटप जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Distribution of food grains to needy in Solapur
सोलापूरमध्ये प्रशासनाकडून गरजूंना अन्नधान्य वाटप

By

Published : Apr 5, 2020, 9:24 AM IST

सोलापूर - सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण 40 कॅम्पमध्ये 3100 व्यक्तींची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 40 कॅम्पमध्ये राहणाऱ्या सर्व व्यक्तींना जेवण, निवासाची तसेच आरोग्य तपासणीची सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा....बँकाना आले जत्रेचे रुप, जनधन खात्यातील पैसे काढण्यासाठी महिलांची तोबा गर्दी

परराज्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील अनेक व्यक्ती सोलापूर जिल्ह्यात अडकून पडलेले आहेत. या व्यक्तींची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील गरजू 6 हजार व्यक्तींना अन्न धान्याच्या किटचे वाटप जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संचारबंदीच्या काळात आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात ,1831 गुन्हे दाखल करण्यात आले असून 193 व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणारे 1,871 वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details