सोलापूर -उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान, जमीन सर्वेक्षणाचे काम कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, यावर स्मार्ट सिटीच्या बैठकीत चर्चा झाली. जमीन सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून मोजणीच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे महापालिका अभियंता संदीप कारंजे यांनी बैठकीमध्ये सांगितले.
उजनी ते सोलापूर जलवाहिनी संदर्भात स्मार्ट सिटीच्या बैठकीत चर्चा - सोलापूर स्मार्ट सिटी बैठक
उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीमुळे झालेल्या पिकांचे नुकसान, जमीन सर्वेक्षणाचे काम कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, यावर स्मार्ट सिटीच्या बैठकीत चर्चा झाली.
![उजनी ते सोलापूर जलवाहिनी संदर्भात स्मार्ट सिटीच्या बैठकीत चर्चा Discussion in Smart City meeting regarding Ujani to Solapur waterway](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7782607-730-7782607-1593177319538.jpg)
उजनी ते सोलापूर या दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूर शहरातील पाणी प्रश्न मिटणार आहे. या जलवाहिनीचे काम सुरू झाले असून, त्याबद्दलची माहिती सोलापूर स्मार्ट सिटीच्या आज पार पडलेल्या बैठकीत देण्यात आली. उजनी येथील विमाननगर येथे पंपिंग स्टेशन उभारण्याच्या कामासंबंधी सर्वजनिक आरोग्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागा निश्चित केल्याचे बैठकीत सांगण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीची बैठक सात रस्ता येथील ऑफिसमध्ये पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नूतन आयुक्त पी. शिवशंकर यांची संचालक व सीईओपदी निवड करण्यात आली. नूतन आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सभागृह नेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेते महेश कोठे, संचालक नरेंद्र काटिकर, संचालक चंद्रशेखर पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे तसेच व्हिडीओ कॉन्फरसद्वारे अविनाश पाटील, सह संचालक नगर रचना, पुणे यांच्यासह पी.सी धसनामा, उप सचिव, दिल्ली हेही सहभागी झाले होते.
यावेळी बैठकीत शहरात लाईट पोल बसवण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सुरू असलेली रोडची कामे तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण, लक्ष्मी मार्केट सुशोभीकरण ,इंदिरा गांधी स्टेडियम विकसित करणे, इ-टॉयलेट, डस्ट बीन, यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाइन संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे पीक नुकसान, जमीन सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असून मोजणीच्या कामास सुरुवात होणार आहे. उजनी विमाननगर येथे पंपिंग स्टेशन उभारणे कामी सर्वजनिक आरोग्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जागा निश्चित केलेली आहे. एबीडी एरियामधील मलनिस्सारण, पाणीपुरवठा लाईन, रस्ते तयार आदी कामाचा आढावा आणि प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आले.