सोलापूर :बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दिव्यांग निधीसाठी ( Disability Fund ) सुरु असलेल्या उपोषणादरम्यान एका दाम्पत्याने आपल्या मुलीला तीन महिन्यांपूर्वी गमावले होते. आता याच दाम्पत्याच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. संभव रामचंद्र कुरळे वय 10 वर्ष असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केले जात आहे. दिव्यांग संघटनेच्या प्रहरच्या अध्यक्षा संजीवनी बरंगुळे ( Sanjivani Barangule president of Prahar ) यांनी न्याय मिळावा यासाठी अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मुलाच्या आणि त्याच्या बहिणीच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्नही आता विचारला जात आहे. 17 तास झाले अजूनही मृत मुलावर अंत्यसंस्कार केले नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमीका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
Disability Fund : उपोषणादरम्यान दिव्यांग मुलाचा मृत्यू, तीन महिन्यांपूर्वी मुलीचाही झाला होता मृत्यू - Disabled boy Dagaon
दिव्यांग निधीसाठी ( Disability Fund ) उपोषण सुरु आहे. उपोषणादरम्यान एका दाम्पत्याने आपल्या मुलीला तीन महिन्यांपूर्वी गमावले होते. आता याच दाम्पत्याच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमीका मृताच्या नातेवाईकांनी घेतली आहे.
![Disability Fund : उपोषणादरम्यान दिव्यांग मुलाचा मृत्यू, तीन महिन्यांपूर्वी मुलीचाही झाला होता मृत्यू Disabled boy Dagaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17117689-thumbnail-3x2-death.jpg)
या गावात घडली घटना :सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मौजे चिखर्डे नावाचं गाव आहे. चिखर्डे गावात 3 महिन्यांपूर्वी एक उपोषण आंदोलन सुरु करण्यात आलं होते. दिव्यांग निधीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेलं होते. 3 महिन्यांपूर्वी दिव्यांग निधी मिळावा म्हणून चिखर्डे ग्रामपंचायतीसमोर आईवडिलांसोबत मुलगा आणि मुलगीही उपोषणाला बसले होते. 13 वर्षीय वैष्णवी रामचंद्र कुरुळे या मुलीचा उपोषणादरम्यान, 3 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. 4 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या दाम्पत्याचा संभव रामचंद्र कुरुळे यांच्या मुलानेही प्राण सोडला आहे. 10 वर्षांचा दिव्यांग मुलगा संभव रामचंद्र कुरुळे हा देखील उपोषणाला बसला होता. या मुलाचाही काल मृत्यू झाल्याने बार्शी येथे प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दिव्यांग निधीसाठी उपोषण : चिकर्डे गावातील कुरुळे कुटुंब दिव्यांग निधीसाठी ऑगस्ट महिन्यात चिकर्डे ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. 3 महिन्यांआधी मुलगी गमावली आणि आता मुलाचाही जीव गेल्यानं कुरुळे पती-पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.