सोलापूर लोकसभेसाठी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल
सोलापूर लोकसभेसाठी पहिल्या दिवशी एक अर्ज - DIPAK
सोलापूर लोकसभेसाठी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला आहे. कर्नाटकातील व्यंकटेश महास्वामीजी उर्फ दीपक कटकधोंड यांनी सोलापूर लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे.
सोलापूर - लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. सोलापूर लोकसभेसाठी पहिल्या दिवशी एक अर्ज दाखल झाला आहे. कर्नाटकातील व्यंकटेश महास्वामीजी उर्फ दीपक कटकधोंड यांनी सोलापूर लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. अनूसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सोलापूर लोकसभेसाठी पहिल्या दिवशी काल २१ जणांनी एकून ३७ अर्ज घेतले आहेत.
सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी एकाने अर्ज दाखल केला आहे. हिंदूस्थान जनता पार्टीकडून व्यंकटेश्वर महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.