पंढरपूर -राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. धनगर समाजाची मागणीही रास्त आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न मांडणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी पंढरपुरात केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा त्यानंतरच पांडुरंगाच्या महापूजेला यावे असा इशारा सकल धनगर समाज कृती समितीकडून देण्यात आला आहे. कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पालक मंत्री भरणे यांनी पत्रकारांशी साधला.
धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे.. राज्यातील प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक..
राज्यातील धनगर समाज याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसीच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. या सर्व गोष्टींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राज्यातील प्रतिनिधी बोलणार असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या इशाऱ्याचे त्यांनी समर्थन केले.
भीमा कृष्णा स्थिरीकरणासाठी पाठपुरावा करणार..
सोलापूर व पुणे जिल्ह्यासाठी कृष्णा भीमा नद्यांचे स्थिरीकरण होणे गरजेचे आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील पाणी प्रश्नासाठी ही योजना मार्गी लागणे गरजेचे आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे राजकारण आणू नये, पालकमंत्री म्हणून मी या योजनेसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही आश्वासन पालकमंत्री भरणे यांनी दिली.