सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात सादर केला. यावेळी धनगर समाजाला आरक्षण जरी मिळाले नसले तरी धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद समाजासाठी केली. त्यामुळे पंढरपूरमधील धनगर समाजाच्यावतीने नामदेव पायरी येथे जल्लोष साजरा करण्यात आला. जल्लोष साजरा करताना पंढरपूरमधील धनगर समाजाने पेढे वाटून आनंद साजरा केला.
धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात 1 हजार कोटी रुपयांची तरतूद; पंढरपुरात पेढे वाटून आनंद साजरा - सरकारचे अभिनंदन
धनगर आरक्षण लागू करुन समाजाला दाखले मिळत नाही तोपर्यंत धनगर समाजाचा लढा चालूच राहणार असल्याचे धनगर समाजाचे समन्वयक सुभाष मस्के यांनी यावेळी सांगितले.
सोलापूर
तसेच धनगर आरक्षण लागू करुन समाजाला दाखले मिळत नाही तोपर्यंत धनगर समाजाचा लढा चालूच राहणार असल्याचे धनगर समाजाचे समन्वयक सुभाष मस्के यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Jun 20, 2019, 10:11 AM IST