सोलापूर- धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूरात नामदेव पायरी जवळ दर्शन घेऊन उपोषण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुध्दी द्यावी, या मागणीची निवेदन देवून धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात आले.
एसटी प्रवर्गाच्या आरक्षणसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन - मोर्चा
धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा, वाजत गाजत पंढरपूरातून मोर्चा काढून टिळक स्मारक येथे आमरण उपोषण करण्यात आले.
![एसटी प्रवर्गाच्या आरक्षणसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4103451-thumbnail-3x2-sol.jpg)
एसटी प्रवर्गाच्या आरक्षणसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन
एसटी प्रवर्गाच्या आरक्षणसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन
धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य असलेले ढोल-ताशा, वाजत गाजत पंढरपूरातून मोर्चा काढून टिळक स्मारक येथे आमरण उपोषण करण्यात आले. या आंदोलनामध्ये राज्यातून हजारोंच्या संख्येने धनगर समाज बांधव सामील झाले होते.
सरकार जोपर्यंत धनगर समाज बांधवांना एसटीचा दाखला देत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार असल्याचे धनगर समाज समिती समन्वयक राम गावडे यांनी सांगितले. अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षणाचे दाखले देण्यात यावे, यासाठी पाडुंरंगाच्या चरणी आमरण उपोषण करण्यात आले.