महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरीत माघी यात्रेसाठी दोन लाख भाविक दाखल - पंढरीत माघी यात्रा

माघी यात्रेनिमित्त पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाची रांग ही गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत गेली आहे. दर्शनरांगेत सुमारे 50 हजार भाविक आहेत. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी 12 ते 13 तास लागत आहेत.

solapur
पंढरीत माघी यात्रेसाठी दोन लाख भाविक दाखल

By

Published : Feb 5, 2020, 10:01 AM IST

सोलापूर -विठू रायाच्या पंढरीत माघी यात्रेच्या सोहळयासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेशसह राज्यभरातून सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. पंढरपुरात बुधवारी माघी एकादशीचा सोहळा संपन्न. पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार आहे.

पंढरीत माघी यात्रेसाठी दोन लाख भाविक दाखल

हेही वाचा -'मेकअप'साठी रिंकू -चिन्मय सोलापूरात...

माघी यात्रेनिमित्त पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्रा शेडपर्यंत गेली आहे. दर्शनरांगेत सुमारे 50 हजार भाविक आहेत. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी 12 ते 13 तास लागत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने पाणी, आरोग्य तसेच दिवबत्तीची सोय केली आहे. 65 एकर परिसरात दिंड्यासाठी प्लॅॉटचे वाटप करण्यात आहे.

हेही वाचा -कडाक्याच्या थंडीत धावले पंढरपूरकर; मॅरेथाॅन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरीत विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे. मठ आणि मंदिरात कीर्तन आणि भजनामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी विठुनगरी दुमदुमली आहे. बहुतांश पायी दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आहेत. अजूनही काही दिंड्या येत असून त्या रात्रीपर्यंत पंढरीत दाखल होतील. मंदिर समितीच्यावतीने दर्शन रांगेतील भाविकांसाठी पाणी, चहा, नाश्ता आणि एकादशी दिवशी फराळाची मोफत सोय केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details