महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काही दिवसांत महाविकास आघाडीचा कार्यक्रम करेक्ट करणार'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव, मंगळवेढा, कासेगाव गादेगाव व पंढरपूर येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रामुख्याने महाविकासआघाडी विरोधात हल्लाबोल केला.

Devendra Fadnavis campaign
देवेंद्र फडणवीस प्रचार सभा

By

Published : Apr 13, 2021, 12:21 AM IST

Updated : Apr 13, 2021, 12:27 AM IST

पंढरपूर (सोलापूर) -भारतीय जनता पक्षाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भुमिपुत्राला संधी दिली आहे. महा विकास आघाडी सरकार विरोधात मतदान करण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना एक संधी आहे. तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या. मी राज्यात महाविकास आघाडीचा कार्यक्रम करेक्ट करतो, अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी राज्य सरकारवर केली.



माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, नंदेश्वर, डोंगरगाव, मंगळवेढा, कासेगाव गादेगाव व पंढरपूर येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी घेतल्या आहेत. यावेळी त्यांनी प्रामुख्याने महाविकासआघाडी विरोधात हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीचा येत्या काही दिवसांमध्ये आपण करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.

काही दिवसांत महाविकास आघाडीचा कार्यक्रम करेक्ट करणार'

हेही वाचा-हे तर महावसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांची मंगळवेढ्यात टीका

ठाकरे सरकारकडून नागरिकांना एक रुपयांचीही मदत नाही

कोरोना काळात राज्यातील नागरिकांना एकाही रुपयांची मदत ठाकरे सरकारने केली नाही. मुख्यमंत्री बांधावर जाऊन हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळवून देऊ, असे सांगत होते. पण या सरकारने फक्त कवडीमोल मदत केली. सावकारी पद्धतीने वीज बिलाची शेतकऱ्यांकडून वसुली केली. लॉकडाउनच्या काळात जनतेच्या हाताला काम नव्हते. त्यांना दुप्पट बिले देऊन तिजोरी भरली. विजेची थकबाकीच्या नावाखाली यांनी शेतकऱ्यांची वीज कट केली. त्यांची ट्रान्स्फर उचलून नेल्याचे पापही केल्याचेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा-फडणवीसांचा पवार पॅटर्न: पंढरपूरमध्ये भर पावसात सभा, यापूर्वी जयंतरावांनी राबवला होता हा पॅटर्न

पंतप्रधान मोदींकडून पस्तीस गावांसाठी निधी आणू-

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये आले. तेव्हा बांधावर जावून सांगायचे 50 हजार देऊ. पण 2 हजार रुपयेही दिले नाहीत. कर्जमाफी करू म्हणाले, पण कोणतीही कर्जमाफी केली नाही. शेतमालाला एफआरपी फक्त मोदी सरकारमुळे मिळत आहे. हजारो रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने दिले आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांची चिंता करत आहे, असा विश्वासही फडणवीसांनी दिला. या भागात 5 हजार कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. ती पूर्ण झाल्यावर कनेक्टिव्हिटी मिळेल, मोठी बाजारपेठ निर्माण होईल. समाधान आवताडेंना निवडून द्या, 35 गावांसाठी मोदींकडून पैसे आणून देतो, असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

एक दिवसीय दौऱ्यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात तब्बल सात प्रचार सभा घेतल्या आहेत.

Last Updated : Apr 13, 2021, 12:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details