सोलापूर - मंगळवेढा येथे भाजपचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, 'मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ संतांची भूमी आहे. म्हणूनच येथील उमेदवारही संत असला पाहिजे. यासाठी सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली' असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीचे म्हणजे 'खोटे बोल पण रेटून बोल' - फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभेत बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. 'येत्या २४ तारखेला आता फक्त निकालाची औपचारिकता बाकी आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते थकले असल्याने सांगत आहेत. ते दोन्ही काँग्रेसचे विलीकरण होणार म्हणून बोलत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीने आत्ताच हार मानली आहे. त्यांनी असा जाहीरनामा दिला आहे की, आपण निवडून येत नाही म्हणून खोटे आश्वासने दिली आहेत. सध्या काँग्रेस राष्ट्रवादीचे वागणे म्हणजे 'खोटे बोल पण रेटून बोल' असे असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा... पवारांचे नाव येताच ईडीला घाम फुटला- खा. कोल्हे
महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी आपले आशिर्वाद हवे आहेत - फडणवीस
गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारचा कारभार जनतेने पहिला आहे. त्यामुळे संपूर्ण जनता आमच्या सोबत आहे. दिशाभूल करणे, खोटी आश्वासने देणे यापलीकडे गेली १५ वर्ष आघाडीच्या पक्षांनी काहीच केले नाही. आम्ही गेल्या पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली, वेग वेगळी मदत मिळवून दिली. जो पर्यंत जनावरांना चारा उपलब्ध होत नाही तो पर्यंत चारा छावण्या सुरू ठेवल्या. शेतकऱ्यांना मदत करून त्यांच्या शेतीलाही पाणी दिले. दुष्काळातही शेतकऱ्यांना दिलासा मिळवून दिला. मंगळवेढ्यात आम्ही केलेल्या कामामुळेच शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. पुराचे सगळे पाणी समुद्रात वाहून जाते, तेच पाणी कॅनॉलद्वारे दुष्काळी भागासाठी देण्यासाठी योजना आखली जात आहे. नीरा कृष्णा स्थिरीकरण तयार केले. आत्ता दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन आलो आहे. या सगळ्या योजना पूर्ण करण्याचे काम सुधाकरपंतांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.