सोलापूर - हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलाला मोठ्या अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी आईने रिक्षाचा स्टेअरिंग हातात घेतला. मोठ्या जबाबदारीने आणि हिमतीने सोलापूर शहरात प्रवाशांना सुरक्षितरित्या पोहचवण्याचे कार्य शोभा घंटे या करत आहेत. आपली परिस्थिती हालाखीची आहे. (History of Women's Day) आपण त्यामधून मार्ग काढून आज हाताला पडेल ते काम करतो आहोत अस त्या सांगतात. (2018)पासून सोलापूर शहरात शोभा घंटे रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करतात. आज महिला दिनानिमीत्त त्यांच्याशी ईटीव्ही भारतची खास बातचीत.
आपल्या कामाशी त्या एकनिष्ठ आहेत
अनेक महिला आजही रिक्षावाल्या दीदीची वाट पाहून त्यांच्याच रिक्षात प्रवास करतात. कितीही उशीर झाला तरी त्यांच्याच रिक्षात जातात. पुरुष-महिला असला कसलाही भेद मनात न ठेवता आपल्या कामाशी त्या एकनिष्ठ आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्त्री आपले कर्तृत्व सिद्ध करू पाहत आहे. यामध्ये ते काम करण्यास उत्साह जास्त असेल तर कठीण कामही सोपे होते. (Women's Day significance) असेच कार्य सोलापुरातील शोभा घंटे यांनी करून दाखवले आहे.
पतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला
बेताची परिस्थिती असली तरी खचून न जाता संकटाचा सामना शोभा यांनी संघर्ष कायम केला. शोभा यांचे पती एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात. मात्र, घर चालावायचे, मुलांचे शिक्षण, या सगळ्या गोंष्टींसाठी पैशाची गरज भागते. (International Women's Day 2022) एकाच्या पगारावर घर काही चालत नाही. या या परिस्थितीला सामोर जाताना शोभा यांनी पतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतला. पण आचारी न होता, समाजसेवा करत घर चालवू आणि मुलाला उत्तम शिक्षण देऊ असा निश्चय त्यांनी केला. एका खाजगी संस्थेतर्फे रिक्षाचालविण्याचे मोफत प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर बँक लोन मार्फत रिक्षा खरेदी केली. आणि थेट रिक्षाची टेअरिंग धरत आपल्या कामाला त्या लागल्या.