पंढरपूर (सोलापूर) - कोरोना पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर वैष्णवांचा मेळावा भरवण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) सपत्नीक श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची महापूजा (Mahapuja of Vitthal and Rukmini) पहाटे दोनच्या सुमारास करणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी दिली आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना पार्श्वभूमीवर विठुरायाची आषाढी व कार्तिकी यात्रा भरू शकली नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सर्व नियमांचे पालन करून विठुरायाच्या मुखदर्शनाची परवानगी दिली आहे. कार्तिक एकादशी यात्रा निमित्ताने लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडूनही पंढरपूर शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार विठूरायाची महापूजा - Gahininath Maharaj Ausekar
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेची महापूजा पहाटे दोनच्या सुमारास करणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना पार्श्वभूमीवर विठुरायाची आषाढी व कार्तिकी यात्रा भरू शकली नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सर्व नियमांचे पालन करून विठुरायाच्या मुखदर्शनाची परवानगी दिली आहे.
कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. विठ्ठल मंदिर समितीकडून सभागृहांमध्ये सत्कार कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांची उपस्थिती असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा खास पोशाख तयार करण्यात आला आहे. पांडुरंगाला बनारस सिल्क अंगणी तर रुक्मिणी मातेला पैठणी साडी परिधान करणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून कार्तिकी वारी निमित्ताने भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिले आहे. विठ्ठल मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आले आहे. मंदिर परिसरात भाविकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. भाविकांना विठुरायाच्या मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा -अमित शाह यांनी घेतले तिरुपती मंदिरात दर्शन