महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इच्छा मरणाची परवानगी द्या.. चार वर्षांपासून गावात राहायला येऊ न दिल्याने समाजसेवक हवालदिल - demand of death wish by social workers of karamala

वाशिंबे येथील राजेंद्र दत्तात्रय कांबळे हे सामाजिक कार्य करतात. त्यांना दिनांक 16 - 4 - 2016 रोजी भारतीय मराठा महासंघच्या सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांच्याच समाजातील काही लोकांनी या गोष्टीला विरोध करून त्यांना मारहाण केली.

राजेंद्र दत्तात्रय कांबळे कुंटुंब

By

Published : Nov 13, 2019, 10:00 AM IST

Updated : Nov 13, 2019, 10:19 AM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला गावात राहायला येवू दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेंद्र दत्तात्रय कांबळे असे त्या समाजसेवकाचे नाव आहे. मागील चार वर्षापासून त्यांच्या समाजातील काही लोक त्यांना गावात येऊ देत नसल्याची तक्रार त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच इच्छा मरणाची परवानगी ही त्यांनी मागितली आहे. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे.

इच्छा मरणाची परवानगी मागणारे कांबळे कुटुंब
वाशिंबे येथील राजेंद्र दत्तात्रय कांबळे हे सामाजिक कार्य करतात. त्यांना दिनांक 16 - 4 - 2016 रोजी भारतीय मराठा महासंघच्या सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळेस त्यांच्याच समाजातील काही लोकांनी या गोष्टीला विरोध करून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांना गावात राहण्यास बंदी आणली. याशिवाय गावात राहायचे असेल तर हे पद सोडावे लागेल आणि सात लाख रुपये द्यावे लागतील, असा आरोप राजेंद्र कांबळे यांनी केला आहे.

कांबळे म्हणाले, या प्रकरणी मी पोलिसात देखील तक्रार केली होती. याबाबत पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली होती. परंतु याची दखल घेतली गेली नाही. पोलीस अधीक्षक यांच्याकडे इच्छा मरणाची देखील परवानगी मागितली आहे. यामुळे मला विधानसभेचे मतदानदेखील करता आले नसल्याचेही राजेंद्र कांबळे यांनी चॅनलशी बोलताना सांगितले.

Last Updated : Nov 13, 2019, 10:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details