पंढरपूर -राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत. पंढरपूर येथे वाढता कोरोना संसर्गने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आहे. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय कोरोनाबाधित महिलेची यश्वस्वी प्रसुती करण्यात आली. या महिलेची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ आणि माता या दोघांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.
महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह -
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर मतदारसंघांमध्ये कोरोना संसर्ग वाढला. त्यातच पंढरपुरातील कोरोना रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. तर कोणत्या रुग्णांना रेमडेसिवीर, तर काहींना ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. त्याच पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील 21 वर्षीय महिलेस उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेजवळ सोनोग्राफी अथवा इतर तपासणीचे कोणतेही रिपोर्ट नसल्याने तीची कोरोना चाचणी व इतर तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ती महिला कोरोना बाधित आढळून आली. मात्र, तपासणीमध्ये माता व बालकास धोका निर्माण झाला होता. उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती करण्याचा निर्णय वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिराम यांनी घेतला.