सोलापूर- कांदा निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद केल्याचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारकडून प्रति किलो 2 रुपये कांदा निर्यातीसाठी दिले जाणारे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे सोलापुरातील व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये दर पाडले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
राज्यातील कांदा देशाबाहेर विक्री व्हावा, यासाठी कांद्याला प्रति किलो 2 रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान सरकारने जाहीर केले होते. ते प्रति किलो 2 रुपयांची निर्यात प्रोत्साहन अनुदान सरकारने बुधवारी बंद केले आहे. त्यानंतर त्याचा फटका सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला 13 ते 15 रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. मागील 2 दिवसापूर्वी हाच दर 15 ते 18 रुपये प्रति किलो एवढा होता.