बार्शी - वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनसह इंजेक्शनचा तुटवडा यामुळे कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत होता. शासनाच्या नियमावलीबाबत तर्क-वितर्क मांडले जात असतानाच बुधवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला असल्याचे चित्र पहिल्या दिवशी तरी पाहायला मिळाले.
बार्शी शहरासह तालुक्यात लॉकडाऊन घोषित
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अखेर बार्शी शहरासह तालुक्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी ओढवलेल्या परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले आहे.
तालुक्यातील परस्थिती लक्षात घेता निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी बैठक पार पडली. या दरम्यानच, बंदचा निर्णय घेण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने निर्णय घेऊन तालुका बंद ठेवणारा बार्शी हा पहिलाच तालुका आहे. आता या बंदचा कितपत फायदा होणार हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा -दिवे पेटवले, ताट वाजवली, त्यावेळेसचे लॉकडाऊन योग्य होत का? नाना पटोले यांच्या भाजपला कानपिचक्या