सोलापूर - भीमा नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील सांगवी येथे घडली. हनुमंत गलांडे आणि धुळा गलांडे अशी मृतांची नावे आहेत.
नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू - सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील
सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदी पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात बुडून दोघांचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पंढरपूर तालुक्यातील सांगवी येथे घडली. हनुमंत गलांडे आणि धुळा गलांडे अशी मृतांची नावे आहेत.
मयत दोघेजण वारकरी होते. एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी कपडे काढून डोक्याला गुंडाळून पाण्यातून जात होते. ओढयातील भीमा नदीचे पाणी कमी झाले असे समजून ते पाण्यात उतरुन सांगवीहून बादलकोटला जात होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज त्याचे मृतदेह फुगून पाण्यात वर आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
सदर घटनेची नोंद करकंब पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे. तर सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दादासाहेब सुळ व संतोष पाटेकर तपास करीत आहेत.