महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pandharpur Crime: भीमा नदीच्या पात्रात आढळला मृतदेह - भीमा नदीच्या पात्रात आढळला मृतदेह

Pandharpur Crime: उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या भीमा नदी सध्या भरून वाहत आहे. Pandharpur Crime याच दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रामध्ये आज सकाळच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह आढळून आला आहे.

Pandharpur Crime
Pandharpur Crime

By

Published : Oct 25, 2022, 4:15 PM IST

पंढरपूर: उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सध्या भीमा नदी सध्या भरून वाहत आहे. Pandharpur Crime याच दुथडी भरून वाहणाऱ्या नदीपात्रामध्ये आज सकाळच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील चळे येथील भीमा नदीच्या पात्रामध्ये एक मृतदेह आढळून आला आहे.

भीमा नदीच्या पात्रात आढळला मृतदेह

घटनेची माहिती पोलिसांना दिली:पंढरपूर तालुक्यातील चळे येतील भनगी वस्ती या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेताच्या नदीत एक पुरुष जातीचा 50 वर्षे वयाचा मृतदेह आढळला 50 year old body was found आहे. या वस्तीवरील काही नागरिक सकाळी नदीकडे गेले असता, सदर बाब त्यांच्या लक्षात आली. आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

नदीमध्ये सतत पाणी सोडले जाते: परतीच्या पावसानं जोर लावल्यानंतर पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सातत्याने पाणी सोडले जात आहे. भीमा नदी सध्या भरून वाहत आहे. या नदीमध्ये मृतदेह आढळण्याच्या घटना वारंवार घडून येत आहेत. ही घटना हत्या, आत्महत्या, कि घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details