सोलापूर- शहर व जिल्ह्यातील काही भागात सांयकाळी 6 च्या सुमारास परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणच्या सखल भागातील घरामध्ये पाणी साचले आहे. तर परतीच्या पावसाने शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हेही वाचा - चिंचणी गावात फटाके मुक्त दिवाळी साजरी; पशू-पक्षांना त्रास होऊ नये यासाठी घेतला निर्णय
यंदा पावसाने बऱ्यापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगले पीक बहरले होते. मात्र, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा शिकार होत असल्याने, त्यांना सरकारने आधार देणे गरजेचे आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा - पंढरपुरात विड्याच्या पानाला उच्चांकी दर, जुनवान पान बाजारास प्रारंभ