महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुळेवाडीचा ढाण्या वाघ..! 12 किलो वजनाच्या चपला वापरणारे भारदस्त व्यक्तिमत्व दाजी नाना...

दाजी दोलतोडे हे त्यांच्या वजनदार चपलेमुळे ओळखले जातात. कारण म्हणजे दाजी ज्या चपला वापरतात, त्या चपलेचे वचन तब्बल बारा किलो आहे. या वजनदार चपला वापरण्याचा छंद दाजींनी जोपासला आहे. दाजी दोलतोडे यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वला शोभणाऱ्या चपला शोले स्टाईल म्हणून ओळखल्या जातात.

records-for-wearing-the-heaviest-footwear
12 किलो वजनाच्या चपला वापरणारे भारदस्त व्यक्तिमत्व दाजी नाना...

By

Published : Mar 14, 2021, 7:47 AM IST

पंढरपूर- जगामध्ये हौसेला मोल नाही, असे म्हणतात. त्यातच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, एखाद्याचा वेगळा छंद त्या व्यक्तीची ओळख बनवून जातो. त्याचाच परिचय माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील रहिवासी असणारे दाजी आनंत दोलतोडे यांच्या बाबतीतही येतो. दाजी दोलतोडे हे त्यांच्या वजनदार चपलेमुळे ओळखले जातात. कारण म्हणजे दाजी ज्या चपला वापरतात, त्या चपलेचे वचन तब्बल बारा किलो आहे. या वजनदार चपला वापरण्याचा छंद दाजींनी जोपासला आहे. दाजी दोलतोडे यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वला शोभणाऱ्या चपला शोले स्टाईल म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या वजनदार चपलांनी दाजींना समाजामध्ये एक ओळख निर्माण करून दिली आहे.

वजनदार चपला
रुबाबदार व्यक्तिमत्वाला शोभणारा जोडा....

पाहता क्षणी नजरेत भरेल असे व्यक्तिमत्व लाभलेले दाजी नाना यांनी गेल्या वीस वर्षापासून वजनदार चपला वापरण्याचा जगावेगळा छंद जोपासला आहे. हा छंद जोपसण्यासाठी त्यांनी हजारो रुपये खर्च केले आहेत. त्यांची प्रत्येक चप्पल ही किमान बारा किलो वजनाची, जाडजूड व कातड्याची असते. दाजींचे सध्याचे वय 75 आहे. मात्र, या चपलांमुळे दाजी नानांचा भारदस्त व्यक्तीमत्वाचा रांगडेपणा अधिकच उठून दिसतो. बारा किलो वजनाच्या या चपलांची जोडीची किंमत पंधरा हजार रुपये आहे. प्रत्येक चपलीवर वेगवेगळ्या डिझाइन असून. चालताना कर्रर्र...कर्रर्र असा आवाज जणू एखादा पुराणपुरुष चालत असल्याचा भास लोकांना होतो. दाजी नाना यांना बाजारातून वावरताना घुंगरांचा आवाज ही लक्ष वेधून घेतो.

वजनदार चपला वापरणारे भारदस्त व्यक्तीमत्व
दाजी नानांच्या जोड्यांच्या वैशिष्ट्य काही खासच...

दाजी नानांना लहानपणापासूनच आकर्षक बांधणीच्या चपलेचे वेड होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या चपलाही लाखात एक अशाच वापरल्या. दाजींनी आज पर्यंत २ किलो पासून १६ किलो वजनापर्यंतच्या वजनदार चपला वापरल्या आहेत. या जोड्यांचे वैशिष्ट्य असे की, बारा तळी, कातडी त्यावर चार नटबोल्ट, चारशे रिबीटचे गुंफण, त्याभोवती 40 घुंगरे, चपलांच्या मजबुतीसाठी आणण्यासाठी 300 खिळे अशी या चपलाची बांधणी आहे. कोल्हापुरी चप्पलची खरी ओळख कर्र... कर्र असा येणारा आवाज... चपलेला घोड्यांच्या पायाला ठोकण्यात येणारी नाल बसविण्यात येते. नागफणीच्या डिझाईन कमर्शियल मोत्यांची किनार, त्याला नाजूक घुंगराची जोड देण्यात अशी दांजीच्या चपलांची ओळख आहे.

शोले स्टाईल चप्पलच्या नावाची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी...

दाजी नानांनी शोले पिक्चरचे खलनायक अमजद खान यांच्या बुटाच्या देखरेखीवरून वजनदार चपला वापरण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच दाजी नानांनी खास बारा किलो वजन असलेल्या शोले स्टाईल चपला तयार करून घेतल्या व त्याला शोले स्टाईल चपला असे नाव दिले. तसेच त्यांच्या दुसऱ्या चप्पल यांची नावेदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांनी त्यांच्या चपलांना रेल्वेची नावे दिली. त्यामध्ये एकची नाव राजधानी एक्सप्रेस, तर इतर नेत्रावती एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, कोल्हापूर राणी, निशिगंधा एक्सप्रेस यांसारखी नाविण्यपूर्ण नावे त्यांच्या चपलांना दिली असल्याची माहिती या ढाण्या वाघाने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितली.

सुळेवाडीचा ढाण्या वाघ..!

माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांना शोले स्टाईल चपलेची भूरळ...


दाजी नानांना आपल्या शोले स्टाईल चप्पल याची भुरळ सर्वसामान्य माणसांनाच नाही तर 2007 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर आर पाटील यांनाही पडली होती. आर आर आबांना शोले स्टाईल चपलेचे कुतूहल वाटत होते. या छंदासाठी त्यावेळी आबांनी सरकारच्या वतीने प्रमाणपत्र देऊन दाजी नानांचा विशेष सन्मानही केला आहे. तसेच दाजी नानांची या अनोख्या छंदाची केंद्र सरकारसह अनेक संस्थांनी दखल घेतली आहे. लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही या चंपलांची नोंद करण्यात आली आहे. दाजी नानांना या चप्पल छंदामुळे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्याच बरोबर छंदाची माहिती महाराष्ट्रभर पोहोचावी म्हणून दाजी नाना अनेक ठिकाणी भ्रमंती करतात.

ABOUT THE AUTHOR

...view details