महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता दररोज दीड हजार भाविकांनाच मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय - pandharpur

15 मार्च रोजी झालेल्या विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही संख्या दीड हजार इतकी करण्यात आली आहे.

आता दररोज दीड हजार भाविकांनाच मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
आता दररोज दीड हजार भाविकांनाच मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By

Published : Mar 16, 2021, 4:24 PM IST

पंढरपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणार भाविकांची संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीने मुखदर्शन घेणाऱ्यांची संख्या प्रतिदिन दीड हजार इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी ही माहिती दिली आहे.

दररोज केवळ दीड हजार भाविकांना मुखदर्शन
24 फेब्रुवारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीकडून कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करून ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करणाऱ्या भाविकांना विठ्ठलाचे मुखदर्शन दिले जात होते. ही संख्या तीन हजार इतकी होती. मात्र 15 मार्च रोजी झालेल्या विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही संख्या दीड हजार इतकी करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने दर्शन पास बुकिंग करून हे मुखदर्शन दिले जाणार आहे.

विठ्ठल मंदिर समितीची बैठक
17 मार्च 2020 पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी अटी व शर्तींनुसार श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर भाविकांसाठी खुले झाले होते. मात्र त्यानंतर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. यात तीन हजार भाविकांऐवजी दीड हजार भाविकांना मुखदर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी ऑनलाइन पद्धतीची बुकिंग बंधनकारक असणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details