महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्या घेण्यासाठी महिलांची गर्दी; विक्री सेलचे आयोजन - solapur

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांडून रूक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून साड्या मागतात. महिला भाविकांची ही मागणी विचारात घेऊन मंदिर समितीने रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्या महिला भाविकांना देण्यासाठी विक्री सेल सुरु केला आहे.

solapur
श्री.रुक्मिणी माता मंदिर

By

Published : Dec 21, 2019, 11:44 PM IST

सोलापूर- पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथील रुक्मिणी मातेसाठी भाविकांकडून साड्या अर्पण केल्या जातात. खास करून महिला भाविकांकडून रूक्मिणी मातेस नवरात्र व सणासुदीच्या दिवशी साड्या अर्पण केल्या जातात. अशावेळी वर्षाकाठी अर्पण केलेल्या भरपूर साड्या जमा होतात. मंदिराकडे या जमलेल्या साड्यांची संख्या १४ हजारच्या आसपास आहे. या साड्यांची विक्री सुरू झाली आहे.

माहिती देताना श्री. रुक्मिणी मंदिर प्रशासनाचे कार्यकारी अधिकारी जोशी

मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांडून रूक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून साड्या मागतात. महिला भाविकांची ही मागणी विचारात घेऊन मंदिर समितीने रुक्मिणी मातेला अर्पण केलेल्या साड्या महिला भाविकांना देण्यासाठी विक्री सेल सुरु केली आहे. या सेलमध्ये श्री. रुक्मिणी मातेचा प्रसाद म्हणून साडी घेण्यासाठी महिला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. साड्यांचा सेल दि. २० ते ०५ डिसेंबरपर्यंत संत तुकाराम भवन श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेजारी सुरू करण्यात आला आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा-सोलापुरात वाळू माफियांवर महिला अधिकाऱ्यांची धडाकेबाज कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details