सोलापूर- लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी काढाव्या लागणाऱ्या पाससाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी सोलापुरात मजुरांच्या रांगा लागल्या आहेत. सोलापुरात महापालिकेच्या वतीने वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सोलापुरात वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी रांगा... सकाळपासूनच मोठी गर्दी - सोलापूर लाॅकडाऊन बातमी
सोलापुरातून इच्छीत स्थळी जाण्यासाठी मजुरांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वैद्यकीस अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार आहे. ज्यांना प्रवास करायचा आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

हेही वाचा-कोरोना : दिवसभरात ७७१ नवे रुग्ण, राज्याचा आकडा १४ हजार ५४१ वर
सोलापुरातून इच्छीत स्थळी जाण्यासाठी मजुरांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वैद्यकीस अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार आहे. ज्यांना प्रवास करायचा आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे हे प्रमामपत्र घेण्यासाठी लोकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे. सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीने 10 ठिकाणी वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या दवाखान्यात लोकांनी गर्दी केली आहे.