सोलापूर - मागील 5 ते 6 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पडत असलेल्या परतीच्या पावासामुळे शेतीसोबतच कांदा, सोयाबीन सारख्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे.
गेल्या 8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात रोजचा पाऊस सुरू आहे. रोज कोसळणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील शेती पीकाचे मोठे नूकसान झाले आहे. कांद्याच्या शेतातील सरींमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कांदा नासत आहे. तर, कापून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फूटण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.