अक्कलकोट (सोलापूर) -सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेने अक्कलकोट येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे. गोपाळ गणेश तलवार (35), कुमार अडवेअप्पा मेडकुंदी (26), नामदेव पांडू राठोड (40), जगदीश बाबुराव कष्टगी (32), शरनप्पा अमृत माळी (30), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. यापैकी नामदेव पांडू राठोड (40) हा आरोपी जुगार अड्ड्याचा चालक असून तो सोलापूरचा रहिवासी आहे. तर उर्वरित आरोपी हे कर्नाटक येथील रहिवासी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 5 लाख 77 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दुधनी शिवारातील गतिमंद शाळेजवळ सुरू होता जुगार अड्डा -