पंढरपूर (सोलापूर) - गेल्या एक- दीड वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लॉक अनलॉक पद्धतीने चालू आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या उत्पादनातही तफावत दिसून आली आहे. मंदिर समितीकडून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामधील एक भाग म्हणून मंदिर समितीकडून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या आकर्षक अशा मातीच्या विविध 31 रूपातील आणि पोशाखातील 72 हजार प्रतिमा निर्माण करण्यात आल्या आहेत.
श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या 72 हजार प्रतिमाची निर्मिती गेल्या पंचवीस ते तीस वर्षातील फोटोंच्या प्रतिमा -
गेल्या दीड वर्षापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी कधी खुले तर कधी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली होती. त्यातच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा टाळेबंदीत खर्चही मोठ्या प्रमाणात झाला. ती भरून काढण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या प्रतिमा तयार करून त्या भाविकांना विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला. गेल्या पंचवीस ते तीस वर्षातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे फोटो काढून त्यांची विक्री केली जात होती. त्यामध्ये त्यांनी बदल करत व्यावसायिक फोटोग्राफरकडून देवतांचे फोटो काढून त्यांची प्रतिमा तयार करण्याचे काम दिले आहे.
प्रतिमा मंदिर समितीच्या वेबसाईटवरही उपलब्ध -
श्री विठ्ठल रुक्मिणी मातीच्या विविध 31 रूपातील आणि पोशाखातील 72 हजार प्रतिमा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रतिमांना वॉटरप्रूफ आणि चांगल्या दर्जाच्या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. या प्रतिमेची 100 रुपयांपासून ते 2000 रुपये पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देवाच्या प्रतिमेला वाईट लाईन ही अत्याधुनिक प्रिंटिंग मशीनचा मंदिर समितीकडून खरेदी करण्यात आली आहे. या मशिनद्वारे या 72 हजार प्रतिमा तयार करण्यात येत आहेत. यासाठी मंदिर समितीतील आठ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या प्रतिमेसाठी मंदिर समितीकडून लवकरच एका शोरूमचे ही तयारी करण्यात आली आहे. तसेच या प्रतिमा मंदिर समितीच्या वेबसाईटवरही उपलब्ध होणार आहेत. अशी माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दीड वर्षाचे उत्पन्नात तफावत -
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून सुमारे 27 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडवले आहे. मंदिर समितीकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी वर्षातील चार महिन्यात मुखदर्शनाची सोय करण्यात आली होत. मात्र त्यानंतर कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आठ महिने बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे भाविकांकडून मिळणाऱ्या देणगी मध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये मोठी घाट दिसून येते. अशी माहिती जोशी यांनी दिली आहे.
हेही वाचा - अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री विठ्ठल- रुक्मिणी गाभाऱ्यास दुर्वांची आकर्षक आरास