महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'एमपीएससी'च्या परिक्षार्थ्यांना मिळणार 'कोविड किट' - निवासी जिल्हाधिकारी - सोलापूर एमपीएससी बातमी

राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्चला होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परीक्षार्थ्यांना कोविड किट देण्याची तयारी केली आहे, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.

Covid Kit will provide for MPSC Examiner by administration of Solapur
संग्रहित छायाचित्र

By

Published : Mar 20, 2021, 6:46 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसेवा स्पर्धा पूर्व परीक्षा 21 मार्चला होत आहे. मात्र, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षार्थींना प्रशासनाकडून कोविड किट देण्याची तयारी प्रशासनाने केल्याची माहिती सोलापूरचे निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी दिली.

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर 21 मार्चला सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 22 केंद्रांवर 8 हजार 800 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून कोविड पार्श्वभूमीवर उपाययोजना

21 मार्चला संपूर्ण राज्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याच्या स्पर्धा परीक्षेचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडून कोविड कीट देण्यात येणार आहे. यामध्ये हातमोजे, मास्क, सॅनिटायझर यांचा समावेश असणार आहे. तसेच परीक्षा केंद्रावर आल्यानंतर विद्यार्थ्यांचे तापमान मोजून त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा केंद्रावर या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

जिल्ह्यांमधील 22 केंद्रावर होणार परीक्षा

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर 14 मार्चला राज्यसेवा परीक्षा घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. त्यानंतर राज्य शासनाकडून 21 मार्चला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे जिल्हा प्रशासनाकडून स्पर्धा परीक्षेचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील 22 केंद्रांवर 8 हजार 800 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.

हेही वाचा -पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांच्याकडून निवडणूक तयारीची पाहणी

ABOUT THE AUTHOR

...view details