महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर येथे मल्टिप्लेक्स थिएटर बंद करून युवा उद्योजकाने उभारले कोविड रूग्णालय

पंढरपूर येथे मल्टिप्लेक्स थिएटर बंद करून युवा उद्योजकाने कोविड रूग्णालय उभारले आहे. कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी येत्या दोन दिवसात रूग्णालय खुले होणार आहे.

पंढरपूर
पंढरपूर

By

Published : Apr 26, 2021, 7:44 PM IST

पंढरपूर -राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. जिल्ह्यात रोज हजारो कोरोना रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर व रूग्णालये हाऊसफुल झाले आहेत. पंढरपूर येथील युवा उद्योजक अभिजित पाटील यांनी स्वतःचे पंढरपूर येथील मल्टीप्लेक्स असणारे दोन मजली थेटर कोरोना ग्रस्तांच्या कोविड रूग्णालयासाठी दिले आहे. आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पाटील यांनी स्वखर्चाने अत्याधुनिक अशा 50 बेडचे कोविड हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. कोरोना ग्रस्तांच्या सेवेसाठी येत्या दोन दिवसात रूग्णालय खुले होणार आहे.

मल्टिप्लेक्स थेटर बंद करून कोविड हॉस्पिटल उभारले -

सोलापूर जिल्ह्यात रोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. जिल्हा प्रशासनातील आरोग्य यंत्रणेवर यामुळे अधिक ताण पडत आहे. काही रुग्णांना उपचारा अभावी मृत्यु पत्करावा लागत आहे. त्यातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदारसंघांमध्ये कोरोनाचा आकडा हजारांच्या घरात गेला आहे. पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील यांनी मल्टिप्लेक्स थेटर बंद करून कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी रूग्णालय तयार केले आहे. पंढरपूर येथील सामान्य कुटुंब व गरीब नागरिकांना माफक दरात उपचार मिळावे या हेतूने त्यांनी या कोविड रूग्णालयाची उभारणी केली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये हे रूग्णालय रुग्णांसाठी खुले होणार आहे.

अत्याधुनिक कोविड रुग्णालयाची उभारणी -

पंढरपूर येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून नवीन रूग्णालयाची उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंढरपूरच्या मातीतील उद्योजक अभिजीत पाटील हे स्वखर्चाने रूग्णालयाची निर्मिती केली आहे. त्यांनी स्वतःच्या मल्टिप्लेक्समध्ये 50 बेडचे अत्याधुनिक कोविड रूग्णालय उभे केले आहे. या रूग्णालयामध्ये वैद्यकीय उपकरणे, कोरोना वरील औषधे, प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे प्रशिक्षित केले गेले आहे. सोयीयुक्त पहिल्या टप्प्यातील 50 बेड तयार करण्यात आले असून. त्यानंतर गरज भासल्यास बेडची संख्या वाढवण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.

ऑक्‍सिजनचा पायलट प्रोजेक्ट सुरू -


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व कारखानदारांना ऑक्सीजन प्रोजेक्ट उभारण्यासाठी आग्रह धरला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याच्या वतीने ऑक्सीजनचा पायलट प्रोजेक्ट उभारण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुढाकार घेतला. विठ्ठल मंदिर समितीच्या वेदांत आणि व्हिडीओकॉन या दोन भक्त निवासांध्ये २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details