पंढरपूर (सोलापूर) -जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर योग्य ते उपचार मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अवघ्या 38 तासात पंढरपूर येथे कोविड ऑक्सिजन रुग्णालयाची रुग्णालयची उभारणी करण्यात आली आहे. कोविड रुग्णालयमध्ये अत्याधुनिक सुविधा असणारे यंत्रणा बसवण्यात आल्याची माहिती पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी अवघ्या 38 तासात रुग्णालयाची उभारणी
जिल्हा पोलीस वेल्फेअर फंड व देणगीदारांच्या माध्यमातून आवश्यक की निधी जमा करून हे कोविड रुग्णालय उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये 48 ऑक्सिजन बेड असणार आहेत. त्याशिवाय 20 निरिक्षण बेड असणार आहेत. रुग्णांवर लक्ष देण्यासाठी आरोग्य सेवकांचे पथक या ठिकाणी तैनात असणार आहे. सातारा येथील डब्ल्यूआर ग्रुप ऑफ बिझनेसचे रोहन वाघमारे यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या 38 तासांमध्ये रुग्णालयमध्ये आवशक्य असलेल्या सुविधा तयार करून रुग्णालयची उभारणी केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक सातपुते यांच्या पुढाकारातून कोरोना रुग्णालय
कोरोनाग्रस्ताची दिवसेंदिवस वाढत आहे. पंढरपूर, मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पोलीस बंदोबस्त असेल किंवा कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंदोबस्त असेल. मात्र त्यातून पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य ते उपचार मिळावे म्हणून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथील पोलीस संकुलमध्ये कोविड ऑक्सिजन रुग्णालयची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पोलीस कर्मचारी व नातेवाईकांना योग्य ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचार्यांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. हे अत्याधुनिक सोयींनी उपयुक्त रुग्णालय असणार आहे.
कोविड रुग्णालयमध्ये नामवंत डॉक्टरांची मदत
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने 68 बेड असणारे कोविड रुग्णालय उभारण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असणारे साहित्य पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच पंढरपूर येथील नामवंत रुग्णालयच्या डॉक्टरांची मदत कोविड रुग्णालयसाठी घेण्यात येणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योग्य ते उपचार मिळावे यासाठी त्यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती विक्रम कदम यांनी दिली.
हेही वाचा -रेमडेसिवीरसाठी महिला रडत पोहोचली नियोजन भवनात; इंजेक्शन वाटपाचा भोंगळ कारभार