सोलापूर -राज्यात ज्याप्रमाणे कोरोनामुळे होणारे मृत्यू लपविण्याचा प्रयत्न केला जातो, त्याचप्रमाणे सोलापुरात देखील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा लपविण्याचे काम महापालिका आयुक्तांनी केले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. ते आज सोलापूर दौऱ्यावर असताना बोलत होते. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीमध्ये देखील घोटाळा करण्यात आल्याचे सोमैया यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. नॉर्मल मृत्यू पेक्षा तीनपटीने अधिक कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. सोलापूर शहरात एप्रिल महिन्यात 1566 मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. या पैकी फक्त 404 मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचे आयुक्त सांगत आहेत. मात्र त्यांनी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा लपवला आहे, असा आरोप यावेळी सोमैया यांनी केला आहे.