सोलापूर -सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय ग्रामीण रुग्णालयात ( Government Hospital )व प्राथमिक आरोग्य केंद्रात ( Primary Health Centre )रुग्णवाहिका चालकांची कंत्राटी भरती करण्यात आली आहे. पण या भरती प्रक्रियेत संशयीतरित्या रुग्णचालकांची भरती केल्याची बाब समोर आली आहे. एकाच व्यक्तीची नियुक्ती दोन ठिकाणी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्यक्ती दोन्ही ठिकाणी हजर न होता तिसऱ्याच ठिकाणी वाहन चालक म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्हा ( Solapur District ) शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात 24 रुग्णवाहिका चालकांची भरती ( Ambulance Drivers Recruitment ) करण्यात आली होती. तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 14 रुग्णवाहिका चालकांची भरती केली आहे. या भरत्या आऊटसोर्सिंग कंत्राटी पद्धतीने भरल्या आहेत. जालना येथील खाजगी कंपनी साई एजन्सी ( Sai Agency ) मार्फत ही भरती झाली आहे.
102 राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा -गर्भवती महिलांच्या सुविधेसाठी राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा ( Ambulance Service for Pregnant Women ) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरिता 102 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यानंतर रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध होणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जननी सुरक्षा कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी सोलापुरातील ग्रामीण रुग्णालयात आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका चालक पदभरती सुरू आहे. वाहतुकीची सुविधा व आर्थिक अडचणीमुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रसूतीपूर्वी व नंतर गर्भवतींना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती.
एकाच व्यक्तीचे नाव दोन यादीत तिसऱ्या ठिकाणी व्यक्ती कामाला -जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात 24 वाहनचालकांची भरती करण्यात आली आहे. यामध्ये इब्राहिम कोरबु या व्यक्तीला सुरुवातीला 16 मार्च 2022 मधील यादीत करजगी अक्कलकोट तालूका ( Karjagi Akkalkot Taluka ) येथील ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती दिली होती. पण 30 जून 2022 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना प्राप्त झालेल्या यादीनुसार इब्राहिम कोरबु या व्यक्तीला शीरवळ ( Shirwal ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती दिली आहे. पण हे महाशय इब्राहिम कोरबु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांचे सरकारी वाहन चालवत आहेत. याची अधिक माहिती घेतली असता ते प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ येथे हजर होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.