महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात - कोरोना लसीकरण न्यूज अपडेट सोलापूर

अखेर कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपली आहे. आजपासून कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात आज सकाळी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या दाराशा रुग्णालयात कार्यरत असलेल्या शकिर हकीम या लॅब टेक्टिशियनला कोरोनाची प्रथम लस देण्यात आली. शहरात दररोज 300 जणांचे लसीकरण केले जाणार असून, ही मोहीम पुढील 20 दिवस चालणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात
सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात

By

Published : Jan 16, 2021, 8:01 PM IST

सोलापूर - अखेर कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपली आहे. आजपासून कोरोनाच्या लसीकरणाला प्रारंभ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात आज सकाळी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या दाराशा रुग्णालयात कार्यरत असलेल्या शकिर हकीम या लॅब टेक्टिशियनला कोरोनाची प्रथम लस देण्यात आली. शहरात दररोज 300 जणांचे लसीकरण केले जाणार असून, ही मोहीम पुढील 20 दिवस चालणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात

शहरातील तीन केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था

पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील तीन केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रत्येक केंद्रावर दररोज 100 व्यक्तींचे लसीकरण केले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण 14 हजार लसी देण्यात आल्या आहेत.

तालुका निहाय लसीचे वाटप

अक्कलकोट- 640, बार्शी- 1960, करमाळा-610, माळशिरस-1790, पंढरपूर-1610, सांगोला-700, दक्षिण व उत्तर सोलापूर-6780 अशाप्रकारे एकूण जिल्ह्यासाठी 14 हजार 610 लसी देण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details