महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बार्शीतील कोरोना संशयितांचा अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवा - जिल्हाधिकारी

बार्शी तालुक्यातील सर्व कोरोना संशयित व्यक्तींना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.

barshi news
barshi news

By

Published : Jul 30, 2020, 7:28 PM IST

बार्शी (सोलापूर)- तालुक्यातील सर्व संशयित व्यक्तींना तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत. बार्शी तालुक्यातील कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शंभरकर यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

बार्शी नगरपालिकेच्या सभागृहात ही बैठक झाली. बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसीलदार डी. एस. कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे, तालुका समन्वयक तथा सहायक निबंधक अभय कटके, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.शितल बोपलकर, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तींच्या संपर्कातील सर्वांची त्याच दिवशी तपासणी करावी. अतिजोखमींच्या संपर्कातील आणि कमी जोखमींच्या संपर्कातील किमान वीस व्यक्तींचे ट्रेसिंग करा. नागरिकांचे सर्व्हेक्षण करा. त्यातून आयएलआय म्हणजे इन्फ्लूएंजा लाईक इलनेस आणि सारीची लक्षणे असणाऱ्या सर्व नागरिकांची तपासणी करा. त्यामध्ये संशयित आढळणाऱ्या व्यक्तींना गृह विलगीकरण (होम क्वॉरंटाईन) न करता संस्थात्मक विलगीकरणावर (इन्टिट्यूशनल क्वारंटाईन) भर द्यावा, अशा सूचना ही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. अधिकाऱ्यांनी परस्परात सुसंवाद ठेवावा. कोणत्याही यंत्रणेला मनुष्यबळ अथवा साधनसामग्रीची आवश्यकता भासल्यास उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी दर दोन दिवसांनी आढावा बैठक घ्यावी, अशा सूचना शंभरकर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जामगांव येथे भेट देवून जामगावचे सरपंच शुभांगी आवटे, उपसरपंच बालाजी गडदे, ग्रामसेवक रणजित माळवे आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. तसेच प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details