सोलापूर - शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कहर करणााऱ्या कोरोनाने आपला मोर्चा आता सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे वळवला आहे. गावाकडचे आकडे वाढायला लागल्यामुळे गावचावड्या सुन्या पडायला लागल्या आहेत. पर्यायानं गावकऱ्यांत दहशत पसरली आहे.
जिल्हयात अक्कलकोट, बार्शी आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हे तिनही तालुके आता हॉटस्पॉट होऊ लागले आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील चिंता अधिक वाढली आहे.
शहरानंतर आता सोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव, गावांमध्ये भीतीचं वातावरण
सोलापूर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कहर करणााऱ्या कोरोनाने आपला मोर्चा आता सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे वळवला आहे. गावाकडचे आकडे वाढायला लागल्यामुळे गावचावड्या सुन्या पडायला लागल्या आहेत.
गेल्या 13 एप्रिलला सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर गेले दोन महिने शहरात सातत्याने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सोलापूर शहरात आजवर 2 हजार रुग्ण सापडले असून, 170 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोलापूर शहर हे राज्यात रेडझोन लिस्टमध्ये होते. तुलनेने ग्रामीण भागात कोरोनाने मोठा शिरकाव केलेला नव्हता. मात्र, 21 जून रोजी अक्कलकोट तालुक्यात 30, बार्शी तालुका 30, दक्षिण सोलापूर 90, उत्तर सोलापूर 13, मोहोळ तालुक्यात 10, माढा तालुका 7 असे रुग्ण आढळले असून, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या वाढून 196 तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता 109 झाली आहे. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजवर कोरोनामुळे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा झालेला शिरकाव प्रशासनापुढचे नवीन संकट ठरले आहे. रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी वाढत असून, आता स्थानिक लोकांच्या माध्यमातून संसर्ग होऊ लागल्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान उभे राहीले आहे.