सोलापूर- कोरोनामुळे देशभरात संचारबंदी लागू आहे. सर्व शाळाही बंद असल्याने विद्यार्थ्यांनाही सुटी मिळाली आहे. पण, सुटीच्या काळात घराबाहेर खेळताही येत नसल्याने विद्यार्थी कंटाळून गेले. मात्र, अशा काळात घरी बसून माढ्यातील दोघा भावंडांनी कोरोना गीत तयार केले आहे. प्रणव व समर सोमनाथ शिंदे अशी त्या दोघांची नावे आहेत.
माढ्याच्या जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता सातवीमध्ये प्रणव तर कचरे वस्ती प्राथमिक शाळेत चौथीत समर शिकतो. दोघांचे वडील सोमनाथ शिंदे हे जिल्हा परिषद शाळे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांनी सुटीच्या काळात कोरोना विषयी एक गीत तयार केले. त्यानंतर प्रणव व समरला गाण्यास दिले. या दोघांनी तबला, हार्मोनियमच्या साथीने संगीतबद्ध करून गायन केले.