महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जवळेकर रुग्णालय प्रशासनाला कोविड नियमांचा विसर; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे चौकशीचे आदेश - pandharpur corona latest news

जवळेकर रुग्णालयामधील कोविड सेंटरमधून उपचार घेतलेल्या रुग्णांचा मृत्यू दरही जास्त आहे. कोरोनावरील चुकीच्या उपचारांमुळे व स्टेराॅईडच्या अतिरिक्त वापरामुळे म्युकरमायकोसीस (बुरशीजन्य)सारख्या रोगाचे रुग्ण राज्यात वाढताना दिसत आहेत.

 जवळेकर रुग्णालय पंढरपूर
जवळेकर रुग्णालय पंढरपूर

By

Published : May 15, 2021, 7:55 PM IST

पंढरपूर -करमाळा शहर व तालुक्यात कोरोना धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे. त्यातच शहरातील प्रसिद्ध जवळेकर हॉस्पिटलमध्ये राज्य सरकारने घालून दिलेल्या आरोग्य मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान त्याचा परिणाम जाणवत आहे. जवळेकर रुग्णालयात कोरोनाचे उपचार घेत असताना मरण पावलेल्या रुग्णांची ऑडिट करून सदर हॉस्पिटल व डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रार मानवी हक्क कार्यकर्ते ॲड. विकास शिंदे यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ तक्रारीची दखल घेत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जवळेकर कोविंड सेंटरला करुणा मार्गदर्शक तत्वांचा विसर
भारतीय वैद्यकीय परिषदकडून कोरोना विषाणूच्या उपचारादरम्यान काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. त्याचप्रमाणे उपचार होणेही गरजेचे असते. त्यानुसारच कोरोना रुग्णांचे उपचार होणे अपेक्षित आहे. मात्र, करमाळा शहरात परवानगी देण्यात आलेल्या जवळेकर रुग्णालयाच्या कोरोना सेंटरमध्ये या मार्गदर्शक सूचनांचे पालन होत नाही. मात्र, कोरोना सेंटरमध्ये मनमानी व चुकीच्या पद्धतीने रुग्णांवरती उपचार केले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागातील इतर रुग्णालयांपेक्षा या रुग्णालयाचा मृत्यू दर खूप जास्त आहे.

इंजेक्शनचे रुग्णांवर घातक परिणाम

90 पर्यंत ऑक्सिजन लेवल असलेल्या रुग्णाला रेमेडेसिवीर इंजेक्शन देण्याची आवश्यकता नसतानाही पाच ते सहा इंजेक्शन दिली जात आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरा होण्यापेक्षा इंजेक्शनचे रुग्णांवर होणारे घातक परिणाम जास्त भयंकर आहेत. अगदी कमी प्रमाणात त्रास असणाऱ्या रुग्णांना जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे येथील कोविड सेंटरची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

जवळेकर हॉस्पिटलमध्ये रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे
जवळेकररुग्णालयामधील कोविड सेंटरमधून उपचार घेतलेल्या रुग्णांचा मृत्यू दरही जास्त आहे. कोरोनावरील चुकीच्या उपचारांमुळे व स्टेराॅइडच्या अतिरिक्त वापरामुळे म्युकरमायकोसीस (बुरशीजन्य) सारख्या रोगाचे रुग्ण राज्यात वाढताना दिसत आहेत. दुर्दैवाने जवळेकर रुग्णालयामध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळून येत असल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
जवळेकर रुग्णालयाच्या कोविड केअरची तातडीने तपासणी करण्यात यावी तसेच तेथे झालेल्या मृत्यूंचे ऑडिट करून संबंधित रुग्णालयवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठपुरावा करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारीची योग्य दखल न घेतल्यास लोकांचे जीव वाचविण्यासाठी जनहितार्थ उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशाराही ॲड. शिंदे यांनी दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details