पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यात एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. सप्टेंबर महिन्यात 1029 गावांपैकी आता 736 गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग पोहोचला आहे. 209 गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे. पण आता महिनाभरात 316 गावांची वेस कोरोना विषाणूने ओलांडल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरा हजाराच्याही पुढे गेली आहे.
चार महिन्यात कोरोना सोलापूर जिल्ह्यातील 736 गावांच्या वेशीवर - pandharpur corona update news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवस्था गतिमान करण्यासाठी केलेल्या अनलॉकनंतर ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच सप्टेंबर अखेर जिल्ह्यातील नवीन ३१६ गावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे चित्र दिसत आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर लोक कोरोनाबाधित गावे व शहरांमध्ये प्रवास करू लागल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. लॉकडाऊन काळात नियम कडक असल्याने प्रत्येक गावांमध्ये बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश दिला जात नव्हता. त्याचबरोबर जे कोणी गावकरी बाहेरून परतले त्यांना शाळेत चौदा दिवस अलगीकरणात ठेवण्यात येत होते. पण आता हे नियम शिथिल झाल्याने गावकरी कामानिमित्त कुठेही फिरत आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.
अनलॉकनंतर ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेले. जिल्ह्यात 609 गावे कोरोनामुक्त होती व फक्त 6 हजार 772 पॉझिटिव्ह रुग्ण होते व मृतांची संख्या फक्त 194 होती. पण आता महिना होत नाही तोवर ९ सप्टेंबरअखेर रुग्णांची संख्या 15 हजार 101 तर मृतांची संख्या 439 झाली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर कामानिमित्त लोक बाहेर पडले. बाधित गावे व शहरात प्रवास. कोरोना प्रतिबंधासाठी सांगितलेल्या मास्क वापर, फिजिकल डिस्टन्स, हात धुणे या नियमावलीचा विसर. भाजीपाला, इतर खरेदीसाठी गर्दीत वावराताना दिसून येत आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावरही माहिती न देणे हे कोरोना वाढीसाठी कारणीभूत आहेत. आरोग्य विभागाकडून कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रॅपिड अँटिजेन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. याद्वारे बाधितांचा शोध घेऊन संसर्गावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत आहे.