सोलापूर- जिल्ह्यातील 247 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 208 जणांचे कोरोना अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. यामुळे सोलापूर जिल्हा हा कोरोनामुक्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
सोलापुरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही; आत्तापर्यंत 208 जणांचे अहवाल निगेटिव्ह - सोलापूर शहर पोलीस
सोलापुरात आत्तापर्यंत 247 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 208 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व निगेटिव्ह आहेत. अद्यापही 39 व्यक्तींचे अहवाल यायचे आहेत. त्यामळे सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त आहे, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले आहेत.
सोलापुरात आत्तापर्यंत 247 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी 208 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व निगेटिव्ह आहेत. अद्यापही 39 व्यक्तींचे अहवाल यायचे आहेत. या 39 जणांमध्ये 9 व्यक्ती डेंगीलवाडी येथील तर पुण्याहून आलेल्या 19 व्यक्ती तर मुंबईहून आलेले तिघांचा समावेश आहे. दक्षिण सोलापूर वांगी परिसरातील सर्व 3060 लोकांची आरोग्य तपासणी आजही करण्यात आली असून सर्वांची प्रकृती चांगली आहे. या परिसरातील 56 पैकी 47 जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी 9 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सोलापूर शहर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये 12 एप्रिल रोजी कारवाई केली असून जवळपास 127 मोटारसायकली आणि 2 चार चाकी वाहने ताब्यात घेतली आहेत. 29 मार्च पासून आत्तापर्यंत 2274 मोटार सायकल, 168 रीक्षा आणि 34 चारचाकी वाहन ताब्यात घेतली आहेत. तर सरकारी आदेशांचे उल्लंघन करणे अफवा पसरवणे या कायद्यान्वये 1596 गुन्हे 20 मार्च पासून दाखल झाले आहेत.