सोलापूर -शहरात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. बुधवारी सांयकाळी एक तासापेक्षा जास्त वेळ पाऊस झाल्यानंतर गुरुवारी पुन्हा सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. सहा वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस जवळपास पाऊण तास बरसला.
सोलापुरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस, खरीपासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा - heavy rain solapur latest news
सोलापूर शहरात दुपारी कडक ऊन पडले होते. यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. यानंतर जिल्ह्यातील काही भागात सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.
![सोलापुरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाऊस, खरीपासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा continuously 2nd day rain in solapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7965488-4-7965488-1594352736780.jpg)
सोलापुरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस
शहरात दुपारी कडक ऊन पडले होते. यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. यानंतर जिल्ह्यातील काही भागांत सांयकाळी पावणे सहाच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. खरीपातील सोयाबीनची दुबार पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. मागील दोन दिवसात शहर आणि जिल्ह्यात पाऊस पडत असला तरी खरिपाच्या पिकासाठी आवश्यक असलेला पाऊस अजून पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा -पुणे : ठेकेदाराने पगार न दिल्याने सुपरवायझरची गळफास घेत आत्महत्या